अल्पवयीन चोरट्याच्या तालमीत तयार झालेल्या दोन चोरांकडून ४गुन्हे उघडकीस, १लाख १२हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – अल्पवयीन चोरट्याच्या तालमीत तयार झालेल्या दोन चोरांना गस्तीवर असलेल्या सिडको पोलिसांनी टि.व्ही.सेंटर भागात पकडून त्यांच्या ताब्यातून १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सिडकोसहित जवाहरनगर आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
शेख सोहेल शेख इस्माईल(२२) रा.गरमपाणी , सय्यद ताहिल सय्यद नईम (२०) रा.छावणी अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर या आरोपीसोबंत एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेण्यात आले. हा अल्पवयीन चोरटा वरील अटक आरोपींचा उस्ताद असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.
अटक आरोपींनी रेकाॅर्डवरचा अल्पवयीन चोरटा शेख सिराज शेख सईद(१७)रा.पडेगाव याच्या हाताखाली ट्रेनिंग घेतली. शेख सिराज याच्या नावावर १६ ते १७ चोर्या आहेत. ग्रामीण भागात जाऊनही शेख सिराज सुशिक्षित बेकारांना अशा पध्दतीने काम धंद्याला लावतो.
गुन्हेशाखेनेही शेख सिराज ला अनेकदा घरफोडीच्या गुन्ह्यात पकडले आहे. काही महिन्यांपूर्वीच शेख सिराज ने वडोदबाजार परिसरातून एकाच वेळैस ५० बकर्या चोरुन शहर आणि परिसरातील मटण विक्रेत्यांना विकल्याची माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.
सिडको पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात पाण्याच्या मोटारी, मोटरसायकल, कंप्म्यूटर माॅनिटर अशा वस्तू दोन चोरांकडून जप्त केल्या. यामधे जवाहरनगर आणि सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या मोटरसायकलचाही समावेश आहे.
वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे,पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके,पोलिस कर्मचारी नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, सुरेश भिसे,स्वप्नील रत्नपारखी यांनी पार पाडली.
“अशा अल्पवयीन चोरट्यांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून त्याचे कसे उपयुक्त समुपदेशन करता येईल याकडे या पुढे लक्ष दिले जाईल. गरीबी आणि शिक्षणाचा अभाव व नित्कृष्ट दर्जाचे बालसुधार गृहातील समुपदेशन यामुळे असे गुन्हेगार तयार होणे ही समाजासाठी दुर्देवाची गोष्ट आहे. या पुढे बालसुधारगृहात पाठवण्यात आलेल्या गुन्हेगारांचे योग्य समुपदेशन होते की नाही याची जबाबदारी पोलिस आयुक्तालय घेईन याची मी ग्वाही देतो.”
– डाॅ. निखील गुप्ता (पोलिसआयुक्त)
ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्या मते…
अशा अल्पवयीन चोरट्यांसाठी कायद्यामधे दुरुस्ती आवश्यक आहे. निर्भया प्रकरणात असलेला अल्पवयीन गुन्हेगार मोकाट सुटला आहे.कायद्याने अशा गुन्ह्यात शिक्षेचे वय १८वरुन १६आणले आहे. तरी यामधे अल्पवयीन चोरट्यांसाठी १४हे वय शिक्षेचे असणे गरजेचे आहे.तशी सुधारणा कायद्यात करण्याकरता लोकप्रतिनीधींनी संसदेमधे पुढाकार घेऊन अशा दुरुस्त्या करायला हव्यात
– अॅड. राजेंद्र सुधाकर देशमुख. (जेष्ठ विधीज्ञ,मुंबई उच्चन्यायालय)