AurangabaCrimeUpdate : उच्चभ्रु कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, तीन पीडित महिलांसह ७ जण पोलिसांच्या ताब्यात

औरंंंगाबाद : उस्मानपुरा परिसरातील देवानगरी येथे सुरू असलेल्या उच्चभ्रु कुंटणखाण्यावर छापा मारून पोलिसांनी तीन पीडित महिलासह एक आंटी, एक एजंट (दलाल), आणि दोन आंबटशौकीन ग्राहक अशा एकूण ७ जणांना ताब्यात घेतले. या करवाईत पोलिसांनी रोख रक्कम ७५ हजार रूपये, १० मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार ७५७ रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देवानगरी परिसरातील अमेझॉन अपार्टमेंन्टमध्ये कुंटणखाणा सुरू असून या ठिकाणी परराज्यातील काही मुलींच्या मार्फत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या कुंटणखाण्यावर गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी कुंटणखाणा चालविणारी आंटी कविता रावसाहेब लाटे (वय ३२, रा.बिडकीन, ह.मु. अमेझॉन अपार्टमेंन्ट, देवानगरी), एजंट कल्पेश प्रकाश वायकोस (वय २९, रा.जोहरीवाडा, गुलमंडी), ग्राहक मोहम्मद नसरूल्ला नेमतुल्ला (वय ४५, रा.चौफाला, ब्रम्हपुरी, नांदेड), तौसीफ अहमद अमजद सिद्दीक्की (वय ३०, रा.मुस्फता पार्क , वैजापूर) यांच्यासह तीन पीडित महिलांना ताब्यात घेतले. पीडित महिला पैकी एक १९ वर्षीय तरूणी पश्चिम बंगाल येथील बेगुनिया बनसपुर येथील रहिवासी आहे. वुंâटनखाना चालविणा-या आंटीसह एजंट आणि दोन ग्राहकाविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.