AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 148 रुग्णांना डिस्चार्ज , 54 नवे रुग्ण तर 463 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 148 जणांना (मनपा 135, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42791 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44429 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1175 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 463 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (51)
कैलास नगर (1), ठाकरे नगर (1), मुकुंदवाडी (2), गादिया पार्क (1), माया नगर, एन दोन (1), पडेगाव (1), एमजीएम मुलांचे वसतीगृह परिसर (1), अन्य (43)
ग्रामीण (03)
वाळूज (1), गूड इयर कंपनी परिसर (1), वळदगाव (1)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत चिकलठाणा येथील 74 वर्षीय पुरूष व खासगी रूग्णालयात यशश्री कॉलनी, सिडकोतील 44 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.