AurangabadCrimeUpdate : मुलाशी लग्न केले म्हणून सुनेला गंभीर इजा, सासू प्रियकरासह फरार

औरंगाबाद – मुलाशी लग्न का केले ? असे म्हणंत सुनेला मुलासह रिक्षाबाहेर काढून लाकडी दांडा डोक्यात घालून गंभीर दुखापत पोहोचवली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर आरोपी सासु प्रियकरासह फरार झाली आहे.
शोभा रणनवरे आणि अंकुश पंडित रा. जयभवानीनगर रेल्वेस्टेशनअशी फरार आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मंगळवारी रात्री १०वा. फिर्यादी सून रेखा रणनवरे(३२) ही पती विशाल सोबंत रिक्षाने बाहेर जातांना आरोपी शोभा आणि तिचा प्रियकर अशोक यांनी रिक्षा अडवून रिक्षातून बाहेर काढले व रेखाला लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी रेखा रणनवरे हिच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहूल बांगर करंत आहेत