AurangabadNewsUpdate : वाहतूक विभागाकडून विनंती अर्ज आल्यास सहकार्य करु- नॅशनल हायवे अॅथाॅरिटी

औरंगाबाद – जालना रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी काही मदत लागल्यास वाहतूक विभागाने विनंती अर्ज करावा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून करण्यात येईल.असे स्पष्टीकरण महामार्ग कार्यालयाचे मुख्य अभियंता अजय गाडेकर यांनी “महानायक” शी बोलतांना दिले.
औरंगाबाद जालना रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. पण शहराबाहेरील या रस्त्याचे सुशोभीकरणाचे आणि मजबूती करणाचे काम नॅशनल हायवे अॅॅथोरिटीकडे येते. सध्या चिकलठाणा विमानतळाजवळील रस्ता आणि केंब्रीज चौकाजवळील रस्त्याच्या काही भागाचे काम नॅशनल हायवे अॅथोरिटी कडून सुरु आहे. तसेच शहर वाहतूक शाखेने जालनारोडच्या सुरक्षिततेसाठी काही नवे उपक्रम सुरु केले आहेत उदाहणार्थ टू वे ट्राफिक संकल्पना हा प्रयोग काही ठिकाणी राबवला जात आहे.
रस्त्यावर फक्त दुतर्फा वाहतूक सुरु ठेवण्यासाठी वाहतूक विभाग वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना देतात. योग्य सिग्नलवर योग्य ठिकाणी थांबण्यासाठी रस्त्यावर वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या जालनारोडवर असलेल्या झेब्रा क्राॅसिंग तसेच इतर वाहतूक चिन्हांचा वापर नागरिक पोलिसांदेखतही करण्याची टाळाटाळ करतात किंवा ते अनभिज्ञ असतात. यासाठी सिग्नलजवळ असणारे झेब्रा क्राॅसिंग किंवा अन्य सुरक्षिततेच्या कारणास्तव मदत हवी असल्यास ती सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून निश्र्चीतपणे करण्यात येईल त्यासाठी शहर वाहतूक विभागाला पोलिसआयुक्तालयाने नॅशनल हायवे अॅथोरिटी कार्यालयाकडे विनंती अर्ज करण्यास सांगायला हवे. रस्ते सुरक्षा आणि मेजरमेंट चे काम हायवे अॅथोरिटीच्या निगराणीत होत आहे. असे शेवटी गाडेकर म्हणाले.