AurangabadCrimeUpdate : बनावट सोने तारण ठेवून बँकेला साडेतीन लाखांचा गंडा , १० महिन्यानंतर मूळ आरोपी अटकेत

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत बनावट सोने तारण ठेवुन बॅंकेतील गोल्ड व्हॅल्युअरच्या मदतीने बॅंकेला तीन लाख 47 हजार 464 रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला क्रांतीचौक पोलिसांनी शनिवारी (दि. 31) सायंकाळी गजाआड केले. विष्णु हरिशचंद्र हिंगे (28, रा. रुई भराडी ता. अंबड, जि. जालना, ह.मु. न्यु श्रेयनगर औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून त्याला तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुराडउपाध्ये यांनी रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) दिले.
या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेच्या समर्थनगर येथील शाखेचे व्यवस्थापक अच्युत दत्ताराव दुधाटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, सदरील बॅंकेत सोने तारण ठेवल्याजाते व त्याच्या व्हल्यूऐशनवर 75 टक्के लोन देण्यात येते. बॅंकेच्या समर्थ नगर येथील शाखेत रमेश गंगाधर उदावंत याची मुख्य कार्यालयाने गोल्ड व्हल्युअर म्हणून नेमणुक केली व तसा करार देखील केला होता. दरम्यान आरोपी विष्णु हिंगे याने आरोपी रमेश उदावंत याच्या मदतीने सदरील बॅंकेत 191 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून बॅंकेकडून तीन लाख 47 हजार 464 रुपयांचे कर्ज घेत बॅंकेची फसवणूक केली. त्रयस्त गोल्ड व्हॅल्युअरकडुन सदरील सोन्याची पडताळणी केली असता सोने बनावट असल्याचे समोर आले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करुन आरोपी गोल्ड व्हल्यूअर आरोपी रमेश उदावंत याला 25 जानेवारी रोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवागनी केली. तर आरोपी विष्णु हिंगे याला शनिवारी पोलिसांनी अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपीकडून फसवणुक करुन घेतलेली रक्कम जप्त करणे आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे आहे. आरोपीला गुन्ह्यात कोणी सहाय्य केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले