AurangabadCrimeUpdate : बनावट चावी तयार करुन डाॅक्टरचे घर फोडले, १२ तासात मुद्देमालासह चोरटा जेरबंद

औरंगाबाद -दोन वर्षांपूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करणार्या इसमाने बनावट चावीने घर फोडून ९ लाखांचा ऐवज लंपास केला.पण १२ तासाच्या आत वेदांतनगर पोलिसांनी मुद्देमालासह चोरटा जेरबंद केला.
शेख अमीर शेख सगीर(३५) रा.काली मस्जीद कोकणवाडी असे अटक आरोपीचे नाव आहै.
या आरोपीने डाॅ. दिलीप पटवर्धन यांचे घर फोडले. व ८ लाख ७९ हजारांचे दागिने लंपास केले. डाॅ.पटवर्धन आज सकाळी साडे सहा वा. माॅर्निंगवाॅकला पत्नीसहित गेले होते. घरी परतताच त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांना तक्रार देताच गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी डाॅक्टरांशी चर्चा करंत असतांना असे लक्षात आले की, शेख अमीर हा दोन वर्षांपूर्वी डाॅक्टर पटवर्धन यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करंत असे त्यावेळीही त्याने डाॅक्टरांचे घर फोडले होते पण हाती काहीही लागले नव्हते. त्याच वेळैस त्याने घराची बनावट चावी तयार करुन घेतली अशी माहिती तपासात उघंड झाली आहे. वरील कारवाई पोलिस उपायुक्त डाॅ.निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पीएसआय डुकरे, पोलिस कर्मचारी समद पठाण, राहूल कांबळे,अतुल सोळंके, प्रशांत नरोडे यांनी पार पाडली.