AurangabadCrimeUpdate : लग्न लावून दिड लाखाला लुबाडले , बनावट नवरीसह ५ जणांच्या टोळीला अटक

औरंगाबाद – तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत श्रीरामपूरहून औरंगाबादला बोलावून लग्न लावले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लग्नाची नोंदणी करण्याचा बहाणा करंत दीड लाख रुपयांना गंडवले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी नवरीसह ५ जणांना अटक केली आहे.
सविता राधाकिसन माळी, संगीता विश्र्वनाथ वैद्य, अर्चना देविदास ढाकणे, पूजा अजय राजपूत व रवि तेजराव राठोड अशी अटक आरोपींची नावे आहेत. एक वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जळगावच्या तरुणाला सिध्दार्थ गार्डन परिसरात बोलावून लग्न लावून घेणारी टोळी हीच असावी असा अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी वर्तवला.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील गणेश भाऊसाहेब पवार (२७) या तरुणाच्या भाऊ आणि भावजायीला मोबाईलवर नवर्या मुलीचे फोटो पाठवून तुमचा मुलगा आम्हाला पसंत आहे लवकर लग्न उरका असा तगादा लावला. व लग्नासाठी फक्त दीड लाख रु खर्च येईल असे सांगत पवार कुटुंबियांना १८ आॅक्टोबर२० रोजी मुकुंदवाडी परिसरात बोलावले. व कुंभेफळ येथील देवळात दीड लाख रु.घेऊन आरोपींनी पवार याचे लग्न अर्चना नावाच्या मुलीशी लावले. लग्न लागल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात लग्नाची नोंदणी करुन येतो असे सांगून नवरीसह पाच जणांनी दीड लाख रु घेत पोबारा केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत