AurangabadNewsUpdate : जैन इंटरनॅशनल शाळेची मान्यता रद्द करण्याची शिक्षण उपसंचालकाकडे जिल्हा परिषदेची शिफारस

औरंगाबाद- जैन इंटरनॅशनल स्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारस जिल्हा परिषदेने शिक्षण उपसंचालक मधुकर जाधव यांच्याकडे केली आहे. शहानूर मिंयाॅ दर्गापरिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वाजवी पेक्षा जास्त फीस घेत फीस घेत विना जीएसटी क्रमांक तसेच घेतलेल्या रकमेच्या कमी पावत्या पालकांना दिल्या आणि आर्थिक लूट केली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेले पालक यांनी जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडे जून २० मधे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीवरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी जुलै महिन्यात शिक्षण विस्तार अधिकार्यांची समिती चौकशीसाठी नेमली होती. त्या चौकशीचा अहवाल पालकांच्या तक्रारींची दखल घेणारा होता.त्यानंतर महाराष्र्ट नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा परिषद सी.ई.ओ. यांना २०सप्टेंबर रोजी जैन इंटरनॅशनल शाळेच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. या सर्व घटनाक्रमाची गंभीर दखल घेत गोंदवले यांनी शिक्षणाधिकारी सूरज जैस्वाल यांना शिक्षण उपसंचालकाकडे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५आॅक्टोबर रोजी शिक्षण उपसंचालक मधुकर जाधव यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.