AurangabadCrimeupdate : सावकारी प्रकरणातून अपहरण, सहा जणांना ठोकल्या बेड्या

औरंगाबाद – गजानन मंदीर परिसरातील हाॅटेल व्यावसायिकाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करुन डांबून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सावकाराला त्याच्या ५साथीदारासहित सिटीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.आरोपींकडून ३हजार रु.रोख व गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ जप्त केली.कोर्टाने आरोपींना १दिवसाची कोठडी दिली.
विकास फरतारे रा.शिवाजीनगर यांचे गारखेडा परिसरात सावजी मटन हाॅटेल आहे.एक वर्षापूर्वी बीडच्या सुरेश गिराम या सावकाराकडून फरतारे यांनी ३लाख रु.व्याजावर घेतले हते. पण लाॅकडाऊनमुळे पैशे वेळेवर परंत न करता आल्यामुळे सावकार गाराम याने विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानाच्या परिसरातून फरतारे चे अपहरण केले हते. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून सुरेश गिराम व त्याच्या ५साथीदारांना बीड शहरातून अटक केली. आरोपींमधे राम करांडे, उमेश ऊदावंत, नितेश काळे, कलीमअलीम शेख, शंकर सोळंके यांचा समावेश आहे. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रविण पाथरकर,पोलिस कर्मचारी आप्पा देशमुख, संजय नंद, संदीप तायडे, शेख गफ्फार, देशराज मोरे आदींनी ही कारवाई केली.