Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : पेपर वाचायच्या बहाण्याने आधी विष पाजले आणि नंतर केला बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

कायदे कितीही कडक केले , निषेध झाला तरीही महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी व्हायला तयार नाहीत. अमरावती जिल्ह्यातल्या वरूडजवळ माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला आधी विष पाजून नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे . याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ५५  वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे. अत्याचार झालेली पीडित तरुणी ही आपल्या घराचे दार बंद करून अभ्यास करत होती. त्याचवेळी घराशेजारी राहणाऱ्या आरोपींने त्या पीडित मुलीला पेपर वाचायला मागितला. त्यांनतर ती मुलगी पेपर आणायला घरात गेली असताना आरोपींन तिला किटकनाशक पाजले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहणारा असल्याने त्याने ओळखीचा फायदा घेत हे कृत्य केलं आहे. अनेक प्रकरणात महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपी म्हणून कुटुंबीय , नातेवाईक , शेजारी , ओळखीचे लोक यांचाच मुख्यत्वेकरून समावेश असतो त्यामुळे अशा लोकांकडून होणाऱ्या गैरपराकाराला आळा कसा घालणार हा मोठा प्रश्न आहे.  दरम्यान या प्रकरणात पीडित तरूणीच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरुडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी दिली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!