डॉ. पायल तडवी मृत्यू प्रकरण : आरोपी डॉक्टर महिलांना पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या परवानगी विरोधात पायलच्या आईचे आंदोलन

Mumbai: Payal Tadvi's mother says "Following report of anti-ragging team, action should have been taken against accused, instead SC has allowed them to pursue PG Course. We demand justice"
Payal allegedly died by suicide in May 2019 after harassment by 3 doctors at Nair Hospital https://t.co/t6jonwyF1U pic.twitter.com/uBCbGqIKoe
— ANI (@ANI) October 12, 2020
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी डॉ. पायल तडवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. पायल ही सुद्धा मेडिकलची विद्यार्थ्यिनी होती. सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्टाचे ते आदेश शिथिल केले, ज्यामध्ये त्यांनी सशर्त जामिन देत असे म्हटले की ते कॉलेजमध्ये प्रवेश करणार नाही. कोर्टाने आरोपींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने निकाल जाहीर केला. पण याच कारणास्तव आता मुंबईतील नायर रुग्णालयाच्या बाहेर पायल तडवी हिच्या परिवारासह स्थानिकांकडून आंदोलन केले जात आहे.
या निर्णयाबाबत डॉ . पायल तडवी हिच्या आईने असे म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांना कोर्स पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. यावर सरकारकडून असे म्हणणात आले होते की, आरोपींवरील सुनावणी जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत त्यांना पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी देऊ नये. पायल तडवी हिने 2019 मध्ये मे महिन्यात नायर रुग्णालयातील ३डॉक्टरांकडून छळ केल्याने आत्महत्या केली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने असे म्हटले होते की, डॉक्टरांना त्यांचा पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांनी असे ही म्हटले होते की, या दरम्यान कोणत्याही साक्षीदारावर प्राभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार नाही. त्यांना ट्रायल कोर्टाच्या समोर प्रत्येक तारखेला उपस्थितीत रहावे लागणार आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देत आरोपी डॉक्टरांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत कोर्टाने निर्णय जाहीर केला. तर महाराष्ट्र सरकारने याचिकेचा विरोध केला होता.