AurangabadCrimeUpdate : संतापजनक : स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा हैवान गजाआड

औरंगाबाद – स्वतःच्या मुलीचे गेल्या चार वऱ्हांपासून लैंगिक शोषण करणार्या हैवानरूपी बापाला वाळूज औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.त्याला कोर्टासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. बजाजनगर परिसरात खाजगी नोकरी करणारा (४५) वर्षीय इसम आरोपी आहे.पिडीत मुलगी ही सध्या १८वर्षांची झाली असून पिडीतेची आई १४वर्षाची असतांना दुर्धर आजाराने म त्यू पावल्यानंतर आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण सुरु केले होते.पिडीतेचे लैंगिक शोषण होत असल्याचे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यावर तिने पिडीतेच्या लहान भावाला विश्वासात घेत वाळूज औद्योगिक पोलिसांकडे तक्रार दिली. पिडीतेला एक भाऊ आणि बहीण आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर पिडीतेने स्वता: पोलिसांकडे बुधवारी रात्री तक्रार दिली.वाळूज औद्योगिक पोलिस पुढील तपास करंत आहेत.