MaharashtraNewsUpdate : चिरंजीव प्रसाद यांची नागपूरला बदली तर निखिल गुप्ता औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी निखील गुप्ता येत असून विद्यमान आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र येथे झाली आहे. निखिल गुप्ता हे केंद्रीय प्रतिनियुक्ती वरून औरंगाबाद येथे रुजू होत आहेत . याशिवाय औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांची बदली वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई येथे झाली आहे तर त्यांच्या जागेवर नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम. प्रसन्ना रुजू होत आहेत.
निखील गुप्ता आहे 2005 मध्ये औरंगाबाद येथून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनो शांती सेनेत प्रतिनियुक्ती गेले होते तेथून परत आल्यानंतर त्यांनी नाशिक चे ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते सध्या ते हैदराबाद येथील आयपीएस ट्रेनिंग सेंटर येथे कार्यरत होते . दरम्यान प्रतिनियुक्तीचा पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ते महाराष्ट्र कॅडरमध्ये परत रुजू झाले आहेत. विशेष म्हणजे निखील गुप्ता हे 2003 ते 2005 या कालावधीत औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त पदी कार्यरत होते अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते . निखिल गुप्ता हे उद्या शुक्रवारी औरंगाबाद पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे. निखिल गुप्ता हे 1196 च्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत.
विद्यमान आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आपल्या औरंगाबादच्या कार्यकाळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष प्रयत्न केले . शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. झोपडपट्ट्यातील मुलांना आणि महिलांना इंडो जर्मन आणि इतर संस्थांच्या साहाय्याने विविध व्यवसायाचे विशेष प्रशिक्षण मिळवून दिले. विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे कामही त्यांनी आपल्या कालावधीत केले. दरम्यानच्या काळात शहरात कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासनाला मोठे योगदान दिले. त्यांच्याच कारकिर्दीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. लोकाभिमुख अधिकारी म्हणून चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादकरांना ओळख राहील. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा तर येणारे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे शहरात स्वागत.