AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या शिवानी टाकला “मिस अर्थ इंडिया” स्पर्धेत “मिस फोटोजनीक अवॉर्ड”

औरंगाबादच्या शिवानी टाकची मिस अर्थ इंडिया स्पर्धेच्या पहिल्या १५ स्पर्धकात निवड झाली असून ती मिस अर्थ स्पर्धेची विजयाची प्रमुख दावेदार आहे . शिवानीला या स्पर्धेत मिस फोटोजनीक अवॉर्ड मिळाले आहे. शिवानी आर्किटेक्ट असून सहकार फौंडेशन मार्फत ती स्रियांचे आरोग्य विकासासाठी सामाजिक कार्य करते . पोलीस निरीक्षक सतीश टाक यांची ती मुलगी आहे. ही स्पर्धा डिव्हाईन ग्रुप ,दिल्ली कडून आयोजित केली जाते. पोलिस निरीक्षक सतीश टाक सध्या अदिवासीकल्याण विभागात जातपडताळणी प्रमुख आहेत. शिवानीचेप्राथमिक शिक्षण शहरातील सेंट झेविएर आणि चाटे स्कूल मधून पूर्ण झाले .जेएनइसी मधून तिने आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले असून तिला सामाजिक कार्यात विशेष आवड आहे.