AurangabadNewsUpdate : सासरच्या जाचाला कंटाळून कर्णबधिर विवाहितेने घेतला गळफास

औरंगाबाद – सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेल्या सुनेने सासरच्या ५जणाविरुध्द सुसाईड नोट घेत गळफास घेतला.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ५जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिवनंदा गिरीष ताकटे रा.किनगाव फुलंब्री असे मयताचे नाव आहे.
शिवनंदाचे २०१८साली नात्यातील कर्णबधीर मुलाशी लग्न झाले होते. नवरा गिरीष ताकटे हा पुण्यात खाजगी नौकरी करंत होता.व शिवनंदा किनगावला सासु सासर्याकडे राहात असे. तिला एक मुलगाही झाला आहे.लग्नानंतर सहामहिन्यांनी शिवनंदाला नवरा व्हाॅट्सअॅपवर फारकतीची मागणी करंत असे.हा प्रकार माहेरी कळल्यानंतर शिवनंदाला तिचे वडिल एकनाथ मोतिंगे (५७) रा.एन२सिडको यांनी घरी आणले. २५ आॅगस्ट २० रोजी शिवनंदाने दुपारी गळफास घेतला.मयत शिवनंदावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर माहेरी परतलेल्या मोतिंगे यांना घटनास्थळाजवळ असलेल्या ड्राॅवरमधे मयत शिवनंदाने सासरे अरुण,सासू सिंधू, नवरा गिरीष, नणंद सोनिया पाटील व कामवाली महिला यांनी शिवनंदाचा छळ केल्याची माहिती उघंड झाली. या प्रकरणी मयताचे वडिल एकनाथ मोतिंगे यांच्या फिर्यादीवरुन ताकटे कुटुंबाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी करंत आहेत