AurangabadNewsUpdate : महापालिकेकडून वाहतूक पोलिस विभागाला ठेंगा , पत्रव्यव्हाराची दखलच नाही

औरंगाबाद – गेल्या एक महिन्यांपासून शहरातील आकाशवाणी, अमरप्रित, बीड बायपास वरील सिग्नल बंद आहेत तर दुभाजकांची दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत.याबाबत महापालिकेशी अनेक पत्रव्यवहार करुनही वाहतूक पोलिस विभागाला महापालिका ठेंगा दाखवते. या प्रकरणी महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
गेल्या एक महिन्यांपासून शहरातील आकाशवाणी चौक, अमरप्रित चौकातील सिग्नल बंद आहेत.तर अदालत रोड ते केंब्रीज शाळे पर्यंत अनेक ठिकाणी दुभाजकांच्या दुरुस्त्या रखडल्या आहेत.शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पत्राद्वारे, फोनवर महापालाकेतील संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडें यांना वेळोवेळी वाहतूक नियंत्रण करतांना येणार्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.महापालिकेच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे शहर वाहतूक शाखेवर वाहतूक नियंत्रणाकरता प्रचंड ताण येतो. बेशिस्त वाहनचालकांचे फावते. तसेच कर्तव्यावर असणारे कर्मचारीही अनेक अडचणीचा सामना करंत वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करंत असतात असे पोलिस निरीक्षक देशमुख म्हणाले.महापालिका अधिकार्यांशी याबाबत जेंव्हा जेंव्हा शहर वाहतूक शाखेचा संपर्क होतो. त्यावेळी फक्त दोन दिवसात वाहतूकीचे प्रश्न मिटतील असे सांगितले जाते ते दोन दिवस गेल्या एक महिन्यांपासून येण्याची शहर वाहतूक शाखा वाट बघतेय असे देशमुख म्हणाले.