AurangabadCrimeUpdate : रिकाम्या गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागण्याच्या प्रयत्नात आरोपी अटकेत

औरंगाबाद -आज(मंगळवारी) दुपारी अडीच च्या सुमारास इंड्योरंन्स कंपनीत काम करणार्या मॅनेजरच्या घरात घुसून रिकामा गावठी कट्टा त्यांच्या मुलाच्या डोक्याला लावून ५७ हजार रु.ची मागणी करणार्या दूध डेअरी चालकाला मयूरपार्क परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.
राहूल साहेबराव अदाने(२९) रा.रांजणगाव धंदा दूधविक्रेता असे अटक आरोपीचे नाव आहे.तर संजय गाडे (५२) रा.मयूरपार्क धंदा खासगी नौकरी असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी संजय गाडे हे इंड्योरंन्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपीचा लहान भाऊ गाडे यांच्याकडे घरकाम करतो. आज दुपारी अडीच वाजता दिक्षीत घरात आहेत का अशी विचारणा करंत आरोपी अदाने याने गाडे यांच्या घरात प्रवेश मिळवला. व घरात असलेला १८ वर्षीय मुलाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून घरात जे असेल ते हवाली करा असे म्हणताच फिर्यादीच्या पत्नीने प्रसंगावधान दाखवंत आरोपी अदाने ला घराच्या पहिल्या मजल्यावर नेत शेजारील नागरिकांना मदतीसाठी हाक मारली. नागरिकांनी आरोपी अदानेला चोप देत हर्सूल पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कामे करंत आहेत