Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विविध गुन्ह्यातील ७ चोरट्यांना आणि घरफोड्यांना अटक

Spread the love

बीडबायपास रोडवर जबरी चोरी करणारे तिघे जेरबंद
पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : बीडबायपास रोडवरून आपल्या घराकडे जात असलेल्या व्यक्तीला तीन जणांनी फायटरने मारहाण करून लुटल्याची घटना २५ जुलैच्या रात्री घडली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पुुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मंगळवारी (दि.२८) कळवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत दिगंबर मोरे (वय २३, रा.त्रिविहार नगर, बीडबायपास), आदित्य संपत कोल्हे (वय २२, रा.छत्रपतीनगर, बीडबायपास), अमय शंतनु पोळ (वय २८, रा.सारा-सिध्दी, बीडबायपास) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. २५ जुलैच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तिघांनी अरूण सांडूजी नरवडे (वय ४९, रा.हरिराम नगर,सातारा परिसर) यांना फायटर आणि बेल्टने मारहाण करीत यांच्याजवळील सोन्याची अंगठी व रोख रक्कम ५ हजार ५०० रूपये हिसकावून पोबारा केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विकास खटके, जमादार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, दिपक जाधव, रवि जाधव, कल्याण निकम आदींनी तपास करून लुटमारी करणाNया तिघांना जेरबंद केले.

मुकुंदवाडीतील कपड्याचे दुकान फोडणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : कापड दुकान फोडणा-या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून वीस हजाराचे कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. आकाश अशोक जाधव (वय १९, रा. गेट क्र. ५६, राजनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार नितीन मात्र पसार आहे.
देवळाई परिसरात शुभम जोगस यांचे चंचल कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. ते २५ जुलै रोजी मध्यरात्री चोरांनी दुकानाचे कुलूप तोडून त्यातील तीस हजार रुपयांच्या दोनशे साड्या, २६ हजार रुपयांच्या ६५ जिन्स पॅन्ट, २० हजार रुपयांचे १७२ शर्ट, साडेसात हजार रुपयांचे १७ सलवार सुट व अन्य कपडे व रोख रक्कम असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवत सहायक फौजदार नजीर पठाण व त्यांच्या पथकातील रमेश भालेराव, परभत म्हस्के, विकास माताडे, संदीप बीडकर, नितीन धुळे, विजय भानुसे, आयझेक कांबळे यांनी राजनगरातून आकाश जाधव याला पकडले.

मोबाईल शॉपी फोडणारे दोघे गजाआड
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

औरंंंगाबाद : मोबाईल शॉपी फोडणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी अकरा हजाराचे मोबाईल हस्तगत केले आहेत.
सिल्लोड येथील उमेदसिंग पहाडसिंग राजपूत (रा. शिक्षक कॉलनी) यांचा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय आहे. २० जुलै रोजी नगर परिषदेजवळील राजपूत यांचे दुकान फोडून चोरांनी दोन मोबाईल व साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणावरून शोध सुरू केला. त्यावेळी एमआयडीसी वाळूज परिसरातील सराईत गुन्हेगार सलमान आरेफ शेख (वय २४, रा. रांजणगाव शेणपुंजी) आणि आलीम खान मुकीम खान (वय २१, रा. जोगेश्वरी) यांनी मोबाईल दुकान फोडल्याचे समोर आले. त्यावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अकरा हजाराचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच दोघांनी फुलंब्रीतील एक मोबाईल शॉपी फोडल्याची देखील कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप सोळंके, भगतसिंह दुलत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रिक्षातून प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सिडको पोलिसांच्या ताब्यात
चोरीचे पाच मोबाईल पोलिसांनी केले जप्त

औरंंंगाबाद : रिक्षातून प्रवास करणा-या तरुणाचा मोबाईल लांबवलेल्या चोराला सिडको पोलिसांनी अवघ्या काही तासात पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल जप्त केले आहेत. जमील मुन्शी पठाण (रा. बिस्मिल्ला मस्जिदजवळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण माधवराव शेजूळ (वय ३१, रा. बौध्द विहारामागे, सिध्दार्थनगर, एन-१२, सिडको) हे आंबेडकर चौका ते पिसादेवी रोड असा सोमवारी सकाळी प्रवास करत होते. त्यादरम्यान, रिक्षात (एमएच-२०-बीटी-८४६५) त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने शर्टाच्या खिशातील आठ हजाराचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार राजेश बनकर, नरसिंग पवार, दिनेश बन, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे व किशोर गाढे यांनी मिसारवाडीतील आशिर्वाद बिल्डींगजवळून जमील पठाण याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३७ हजार रूपये विंâमतीचे ५ मोबाईल मिळून आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!