MarathawadaNewsUpdate : महिलांच्या WhatsApp ग्रुपवर स्वतःचा नग्न फोटो पाठविणार अधिकारी निलंबित

महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने Beed Icds urban नावाच्या महिलांच्या ग्रुपवर स्वतःचा उघड फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकारामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.
या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जगदीश मोरे याने मुद्दाम हे फोटो अपलोड झाल्याचे चौकशीत उघडकीस झाले असल्याचे वृत्त आहे. चौकशी समितीच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान जगदीश मोरे या अधिकाऱ्याने माझा मोबाइल हॅक करून फोटो वायरल करत बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, चौकशीअंती यात तथ्य आढळून आले नसल्याचे हर्षदा देशमुख यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या अधिकाऱ्याविरोधात महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी या अधिकाऱ्याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं होतं. आता त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाईल, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.