AurangabadNewsUpdate : अँटीजन टेस्टद्वारे 1764 जणांची स्वॅब तपासणी , 106 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह

आज औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 1764 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 106 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.
शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राजाबजार मध्ये 76 जणांचे स्वॅब घेण्यात आले त्यापैकी सहा पॉझिटिव्ह आले तर पैठण गेट येथील 101 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मसनतपूर 144 पैकी 11 पॉझिटिव्ह आले , तर निराला बाजार येथे 25 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.रेल्वेस्टेशन येथे 78 पैकी दोन, ईटखेडा कॅम्प येथे 93 पैकी तीन, गजानन कॉलनी 102 पैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले . कासलीवाल मार्व्हल 84 येथे पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर कोकण वाडी येथे ही 75 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.केसरसिंगपूरा 126 पैकी अकरा ,शहा बाजार 50 पैकी एक , अयोध्या नगर 148 पैकी 25 , एन बारा 172 पैकी सतरा अहवाल पॉझिटिव्ह आले.
या ठिकाणांसह शहरातील चेक पॉइंटवरही अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दौलताबाद येथे 97 जणांचे स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला तर झाल्टा फाटा येथे 62 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर नगरनाका येथे 168 पैकी सहा , चिकलठाणा येथे 52 पैकी पाच , हर्सुल पॉइंट येथे 42 पैकी चार , कांचन वाडी येथे 69 पैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
शहरात विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांवर कारवाई
औरंगाबाद शहरात आज सायं ६ वाजेपर्यंत सांचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई सिडको- ६९,शहर विभाग – ७३, छावणी- १७ , वाळूज- ३१ एकूण १९० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून १८८ कलमा अंतर्गत २५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त ( गुन्हे) डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितले.