AurangabadLockdownUpdate : महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंप लाॅक डाऊनच्या काळात बंद

औरंगाबाद – लाॅक डाऊनच्या काळात महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंप बंद राहणार असल्याचा आदेश पेट्रोलियम कंपन्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनचे प्रमुख अखिल अब्बास यांनी दिली.
पेट्रोलपंप हे शासकिय नियमानुसार अत्यावश्यक सेवेत येतात.म्हणून उद्यापासुन ९दिवसांसाठी सुरु होणार्या लाॅकडाऊनच्या काळात पेट्रोलपंप सुरु ठेवण्यासाठी शहरातील पेट्रोलपंप असोशिएशनने पोलिसआयुक्तालयाकडे मेल करुन परवानगी मागितली होती.पण पोलिसआयुक्तालयाने पेट्रोलपंप असोशिएशन च्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची खंत अखिल अब्बास यांनी व्यक्त केली.पैट्रोलपंपावर काम करणारे कर्मचार्यांना गेल्या मार्च मधे झालेल्या लाॅकडाऊन मधे पोलिसांकडून मारहाणही झाली होती.पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांना या संदर्भात फोन ही केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे अब्बास म्हणाले.