AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एकूण 7646 । दुपारपर्यंत 142 रुग्णांची वाढ । 3278 रुग्णांवर उपचार सुरू,

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 142 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 88 तर ग्रामीण भागातील 54 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 90 पुरूष तर 52 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7646 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झालेले असून 335 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3278 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (88)
एन सहा मथुरा नगर (3), बालाजी नगर (2), एन चार सिडको (1), हडको (1), उल्कानगरी (1), राहुल नगर (1), मिटमिटा (1), एन आठ सिडको (1), कैलास नगर (1), एकनाथ नगर (1), गजानन कॉलनी (1), पैठण रोड (1), पद्मपुरा (1), बेगमपुरा (1), रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (1), तोरणा नगर (1), सिंधी कॉलनी (17), गांधी नगर (5), मुकुंदवाडी (1), अरिहंत नगर (1), एन सहा सिडको (1), गौतम नगर (7), आंबेडकर नगर (3), आयोध्या नगर (8), नवजीवन कॉलनी (3), सूतगिरणी चौक परिसर (1), गारखेडा परिसर (1), खिंवसरा पार्क (1), एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), मोतीवाला कॉलनी (1), उस्मानपुरा (1), वजीपुरा (1), घाटी परिसर (2) नवनाथ नगर (2), जाधववाडी (1),मयूर पार्क (2),द्वारका नगर (4), एन नऊ (1), एन सात (1), एन अकरा (1)
ग्रामीण रुग्ण : (54)
वाळूज (2), चित्तेगाव पैठण रोड (2), बोरगाव, फुलंब्री (2), बोधेगाव, फुलंब्री (3), गोकुळधाम सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), नंदनवन सो., बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (7), वानेगाव बु. (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (9), ओमसाई नगर,रांजणगाव (3), अर्जुन नगर, रांजणगाव (4), रेणुका नगर,रांजणगाव (1), समता कॉलनी, वाळूज (1), वरूडकाजी (2), गांधी चौक, अजिंठा (1), तेलिपुरा, अजिंठा (1), टिळक नगर, कन्नड (1), खांडसरी, कन्नड (3), खाँसाब का बंगला, कन्नड (1), अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आठ जुलै रोजी पैठण तालुक्यातील कराडी मोहल्ला येथील 56 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील गणेश कॉलनीतील गल्ली क्रमांक चारमधील 80 वर्षीय स्त्री, 9 जुलै रोजी सिल्लेखाना येथील 42 वर्षीय पुरूष, अरिश कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष आणि कन्नड तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 262 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 254 औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. आतापर्यंत घाटीत 254, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.