AurangabadCoronaUpdate : एकूण रुग्णसंख्या 7338, एकूण मृत्यू 330 : कोरोनामुक्त रुग्णसंख्या 4033 तर 2975 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 209 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4033 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 134 तर ग्रामीण भागातील 75 जणांचा समावेश आहे. आज एकूण 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7338 एवढी झाली आहे. आजपर्यंत 330 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 2975 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 204 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 122 तर ग्रामीण भागातील 82 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
सायंकाळनंतर वाढलेल्या रुग्णांमध्ये 20 पुरूष आणि 16 महिला रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (22)
कासलीवाल मार्बल (1), नक्षत्रवाडी (5), बारूदगर नाला (1), मनपा परिसर (1), कांचनवाडी (14)
ग्रामीण रुग्ण : (14)
हतनूर, कन्नड (3) कन्नड बाजारपेठ (1), खांडसरी, कन्नड (2), अंधानेर, कन्नड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (2), समता नगर, सिल्लोड (1), शिवना, सिल्लोड (1), हनुमान नगर, अजिंठा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात पडेगावातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 249, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 330 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दुपारचे अपडेट : जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, दोन रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील एक तर ग्रामीण भागातील एका अशा एकूण दोन पुरूष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7302 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 329 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण :
शिवाजी नगर, गारखेडा (1)
ग्रामीण भागातील रुग्ण :
नेहा विहार, तिसगाव बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सात जुलै रोजी औरंगाबाद शहरातील जटवाडा रोड, हर्सुल येथील 55 वर्षीया स्त्री, पैठण तालुक्यातील 32 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 257 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 249 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 249, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 78, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 329 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.