AurangabadUpdate : पूर्व प्राथमिक आॅनलाईन वर्ग त्वरीत बंद करा, घेतलेली फीस वापस करा, अन्यथा शाळेची मान्यता रद्द

औरंगाबाद – जिल्ह्यातील ज्या शाळांनी इयत्ता पहिली आणि दुसरी चे सुरु केलेले आॅनलाईन वर्ग त्वरीत बंद करुन पालकांकडून घेतलेली फीस वापस करावी तसे न केल्यास व त्यासंदर्भात जिल्हापरिषदेला लेखी तक्रार प्राप्त झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईलअसे आदेश जिल्हापरिषदेच्या शिक्षणविभागाने जारी केले आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक वर्ग चालवणार्या शाळांनी आॅनलाईन वर्ग सुरु करुन त्यांच्या पालकांकडून भरमसाठ पैशे फीस च्या नावाखाली वसूल केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाल्यानंतर वरील आदेश जारी केल्याचे शिक्षणाधिकारी सूरज जैस्वाल यांनी सांगितले. ज्या शाळांच्या विरोधात पालकांकडून लेखी तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त होतील.त्या शाळाचालकांवर आणि शिक्षकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होतील.असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केले.