AurangadNewsUpdate : विलगीकरणाचा कालावधी संपताच मनपा प्रशासक पांडेय थेट कोविड सेंटरच्या भेटीला….

मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आपला विलगीकरणाचा कालावधी संपताच आज दि 29 जून रोजी सकाळी 8 वाजता किले अरक कोविड केयर सेंटर येथे समक्ष पाहणी केली आणि तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जेवण, नाष्टा, पाणी इत्यादी सुविधांबाबत रुग्णांशी विचारणा केलो. यावेळी रुग्णांनी सर्व सुविधा मिळत आहे तसेच इथला स्टाफ सहकार्य करत आहे अशी प्रतिक्रिया दिली. याठिकाणी वातावरण सकारात्मक आणि आनंदमयी आहे, ते म्हणाले. प्रत्येक मजल्यावर पाण्याचे जार पहोच करणे, जेवण वेळेवर देणे आदींबाबत पांडेय यांनी सूचना केल्या. ज्या रुग्णांचा पहिला दिवस होता त्यांनी पांडेय यांनी आपले मोबाईल नंबर दिले आणि काहीही अडचण किंवा सूचना मॅसेज करण्यास सांगितले.
तद्नंतर मा मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी गारखेडा येथे क्रीडा संकुलची पाहणी केली. याठिकाणी अलगीकृत नागरिकांशी संवाद साधला. त्यांना नाष्टा, जेवण पाणी इत्यादी सुविधांवबत विचारणा केली. याठिकाणी गेस्ट हाऊस इतर इमारतींची पाहणी केली आणि क्रीडा संकुलात कमीत कमी 1,000 लोकांची एकाच वेळी ठेवण्याची व्यवस्था त्वरितकरण्याचे आदेश दिले. या दिशेने साफ सफाई व इतर आवश्यक कामांची सुरुवात करण्यात आली आहे.