AurangabadUpdate : कामगार कल्याण भवन परिसरातील कोविड केअर केंद्राला जिल्हाधिकारी यांची भेट

औरंगाबाद तालुक्यातील बजाज नगर परिसरातील कामगार कल्याण भवन परिसरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या कोविड केअर केंद्राला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज भेट दिली. तसेच या केंद्राच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. आरोग्य विभागातील अधिकारी यांनी या परिसरातील कोरोनाच्या प्रसार व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत, सद्यस्थतीबाबत जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांना सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी केंद्रात सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.
या भेटी दरम्यान त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार किशोर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दाते आदींची उपस्थिती होती.