AurangabadCoronaUpdate 4510 : जिल्ह्यात 1985 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ, 232 उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर 18 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4510 झाली आहे. आज दुपारनंतर वाढलेल्या रुग्णांपैकी 16 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून दोन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2293 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 232 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1985 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज दुपारनंतर आढळलेल्या रुग्णांमध्ये 13 पुरूष आणि 05 महिला आहेत.
औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कलेक्टर ऑफिस रोड (1), बेगमपुरा (1), बायजीपुरा (1), कुंभारवाडा (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), नारेगाव (1) , अयोध्या नगर, कैसर कॉलनी, एन सात, सिडको (2), अंबर हिल्स जटवाडा रोड (2) , सातारा परिसर (1), सुवर्णनगर, जालना रोड (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), राधामोहन मंदिराजवळ खोकडपुरा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), देवगिरी हिल्स, शिवाजी नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत
ग्रामीण भागातील रुग्ण
छत्रपती शिवाजी नगर, वाळूज (1), रांजणगाव, वाळूज (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.