AurangabadCrimeUpdate : ” त्या ” जबरी चोरी प्रकरणात १० लाखाच्या मुद्देमालासह एक आरोपी अटकेत

जवाहर नगर व सिडको डीबी पथकाकच्या संयुक्त कारवाईचे यश , अवघ्या सहा दिवसात केली कारवाई
जवाहर नगर व सिडको डीबी पथकाकडून संयुक्तपणे एलईडी टीव्ही चोरीचा गुन्हा व चिकलठाणा पोलिस ठाणे येथील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणात 10 लाख 11 हजार 130 रुपये किमतीचा माल हस्तगत करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , याविषयीची अधिक माहिती अशी की 27 मे रोजी लकजितसिंग सिंग केसर सिंग दुमडा, वय 48 , धंदा व्यापार रा. प्लॉट नंबर 50 सिंधी कॉलनी औरंगाबाद यांच्या मालकीचे सेव्हन हिल जालना रोड औरंगाबाद येथील प्रीतम मार्केटिंग शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडून एकूण 10 लाख 89 हजार 545 रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण 27 एलईडी टीव्ही चोरून नेल्या. अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक व त्यांचे डीबी पथकास गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन जवाहर नगर गुन्हा र. नं. 143/2020 कलम 380, 461, 34 भादवी अन्वये आरोपींनी बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 20- डि .आर. 5014 , देवळाई परिसर, औरंगाबाद येथून चोरी केलेल्या मोटारसायकलचा वापर केलेला आहे. घटनास्थळावरील व जालना रोडवरील सीसीटीव्ही फुटेज जवाहरनगर गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल व आरोपींचा काढून केलेला लपवून ठेवल्याची माहितीची खात्री होताच तत्काळ सदर ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने छापा मारून आरोपी मुस्तफा रब्बुल अन्सारी, वय 22, रा. खैराटुंडा , रोशन टुंडा, राशुंतोरा , गिरिडीह , झारखंड, हल्ली मुक्काम , भारत नगर , पुंडलिक नगर , औरंगाबाद याला सदर गुन्ह्यात अटक केली . आणि त्याच्या ताब्यातून चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील एक लाख रुपये किंमतीच्या पल्सर मोटरसायकल सह पोलिस स्टेशन जवाहर नगर गुन्ह्यातील एकूण 6 लाख 86 हजार 130 रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण 15 एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेला 2 लाख 25 हजार रुपये किमतीचा लोडिंग रिक्षा सह एकूण दहा लाख 11 हजार 130 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील उर्वरित गेला माल व इतर दोन साथीदार फरार आरोपी यांचा पोलीस शोध घेत आहेत .
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे जवाहरनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे , डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाचोळे, शशिकांत तायडे, निवृत्ती गायके, मनोज अकोले, सुखदेव जाधव, विजय वानखेडे , बद्रीनाथ जाधव, नंदू सिंग परदेशी , अंकुश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप दंडवते , पांडुरंग तुपे , योगेश चव्हाण , समाधान काळे, विजयसिंग बमनावत, सिडको डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पोलीस हवालदार राजेश बनकर, नरसिंग पवार, प्रकाश डोंगरे , पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भिसे, किशोर गाडे, विशाल सोनवणे, स्वप्नील रत्नपारखी यांनी केली आहे.