Aurangabad Corona Latest : जिल्ह्यात 1248 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ, मृत्यूची संख्या 48

आतापर्यंत 583 कोरोनामुक्त
औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच कारोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा (१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१), वडगाव कोल्हाटी (१) राजाबाजार (१) एन-४ गणेश नगर (१) एन आठ (१), कटकट गेट (१) , केसापूर (१), एकनाथ नगर (१),मिसरवाडी गल्ली क्रमांक नऊ (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये आठ महिला आणि २२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
घाटीतून ४७ जण कोरोनामुक्त, तीन जणांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आज सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बारी कॉलनीतील ७० वर्षीय पुरूष, सिटी चौकातील ६५ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ४२ वर्षीय पुरूष, पंचकुवा येथील ३५ वर्षीय महिला, जुना मोंढा येथील २५ वर्षीय महिला, सिल्लेखाना येथील २१ वर्षीय महिला आणि फुलशिवरा ७६ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे घाटीतून आतापर्यंत ४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. सध्या घाटी रुग्णालयात ७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६९ जणांची प्रकृती सामान्य असून नऊ जणांची गंभीर आहे.
तसेच घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी सकाळी ११.४० वाजता, किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी संध्याकाळी ११.४० वाजता आणि सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आजपर्यंत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मिनी घाटीतून सहाजणांना डिस्चार्ज
जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये (मिनी घाटी) आज सहा कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, संजयनगरातील ४० वर्षीय पुरूष, पुंडलिक नगरातील ३९ वर्षीय पुरूष, भवानी नगरातील आठ वर्षीय पुरूष आणि ४२ वर्षीय महिला, चिकलठाणा पुष्प गार्डन येथील ६५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एक मृत्यू झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
मनपा कार्यक्षेत्रांतर्गत आतापर्यंत खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.