#AurangabadNewsUpdate : विनाकारण फिरणा-यांचे पोलिसांनी कुठे केले प्रबोधन तर कुठे केली कारवाई….

औरंंंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू असतांना देखील रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांना अडवून पोलिसांनी शनिवारी (दि.२) सिडको उड्डाणपुलाखाली प्रबोधन केले. पोलिसांनी केलेल्या प्रबोधनानंतर वाहनधारकांनी अशी चुक पुन्हा करणार नाही अशी शपथ घेतली.
गेल्या २५ मार्चपासून औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आणि संचारबंदी लागू असतांना देखील शेकडो वाहनधारक मेडिकलवर औषध आणण्यासाठी जात आहे, किराणा सामान आणण्यासाठी गेलो होतो, भाजीपाला आणण्यासाठी जात आहे, दवाखान्यात जात आहे, बँकेत जात आहे अशी विविध कारणे सांगून रस्त्यावर मोकाटपणे फिरत आहेत.
शनिवारी, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वैâलास देशमाने व त्यांच्या पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाNया वाहनधारकांना सिडको उड्डाणपुलाखाली अडविले. रस्त्यावर विनाकारण फिरणाNया वाहनधारकांचे प्रबोधन करीत, त्यांना शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कशी वाढत आहे याची माहिती दिली, तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात राहणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. पोलिसांनी केलेल्या प्रबोधनानंतर वाहनधारकांनी अशी चुक पुन्हा करणार नाही अशी शपथ घेतली.
रिकामटेकड्यांसह फळविक्रेत्यांवर कारवाई
दहा जणांविरुध्द पोलिसात गुन्हे दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रिकामटेकड्यांसह मजूर, फळविक्रेते आणि रिक्षा चालकांसह बारा जणांविरुध्द १ मे रोजी कारवाई केली. वारंवार पोलिसांकडून सूचना आणि प्रबोधन केले जात असतानाही नागरिक मात्र बेजबाबदारीने वागत आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाईला सोमोरे जावे लागत आहे.
मुकुंदवाडीतील संजयनगर भागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण असल्याने तेथील परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. असे असताना गौतम मसाजी भोसले, शेख राजू शेख उस्मान, सौरभ मिलिंद बनकर हे विनाकारण घराबाहेर फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय हडको, टिव्ही सेंटर भागात अमोल अशोक सोनार हा चालक विनाकारण फिरत होता. तर फळविक्रेते शेख रिजवान शेख गुलाब, सरफराज खान हबीब खान, शेख उमेर शेख रशीद, कचरु धर्माजी सोनवणे, दीपक नाथाजी देहाडे हे सायंकाळी हातगाडीवर फळे विक्री करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. तसेच विनाकारण घराबाहेर पडलेल्या रणजीत भिकन पवार, त्याची पत्नी, सुल्तान सत्तार खान पठाण, संदीप बाबुराव मोटे, किरण मुरलीधर सुरडकर यांना पकडण्यात आले.