Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadUpdate : घाटीतील बेशीस्त अ‍ॅम्बूलन्स चालकावर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

Spread the love

औरंंंगाबाद : घाटी रूग्णालय परिसरात अस्ताव्यस्तपणे उभ्या राहणा-या खासगी अ‍ॅम्बूलंन्स चालकावर बुधवारी (दि.२२) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. बेशीस्तपणे उभ्या असलेल्या अ‍ॅम्बूलंन्सच्या चाकातील पोलिसांनी हवा सोडून दिली होती. त्यामुळे अ‍ॅम्बूलंन्स चालक व पोलिसात काही काळ शाब्दीक चकमक उडाली होती.
घाटी रूग्णालयात औरंगाबाद जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रूग्ण येत असतात. रूग्णाला घाटीत दाखल केल्यानंतरही अनेक खासगी अ‍ॅम्बूलंन्सचालक घाटी परिसरातच ठिय्या मांडून असतात. बेशिस्तपणे उभ्या राहणा-या अ‍ॅम्बूलंन्समुळे घाटी रूग्णालय परिसरात वारंवार वाहतूकीची कोंडी होत असते. याबाबत घाटी प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केली होती.
मंगळवारी पोलिसांचे एक पथक घाटी रूग्णालय परिसरात दाखल झाले. या पथकाने बेशिस्तपणे उभ्या असलेल्या अ‍ॅम्बूलंन्सच्या चाकातील हवा सोडून देण्यास सुरूवात केली. हा प्रकार अ‍ॅम्बूलंन्स चालकांच्या लक्षात आल्यावर अ‍ॅम्बूलंन्स चालक व पोलिसा काही काळ शाब्दीक चकमक उडाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!