Aurangabad : मिनी घाटीत आज 75 रुग्णांची तपासणी ; 57 भरती, 42 रुग्णांना उपचारानंतर सुटी

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 जणांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने घरातच अलगिकरणात राहण्याचा सल्ला त्यांना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच नवीन 57 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले.एकूण 57 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी येथे पाठविलेले आहेत. काल आणि आजचे मिळून 42 जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तेथील 72 तपासणी अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 42 रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.