Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अक्षय राजेंद्र रिंढे (वय २४, रा.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय तरूणी चिकलठाणा परिसरातील रहिवासी असून ती शहरातील एका महाविद्यालयात बीएस्सी प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. तीन वर्षापूर्वी पिडीतेची अक्षय रिंढे याच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेम संंबंधात झाल्यावर अक्षय रिंढे याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून ३ जानेवारी ते १६ मार्च २०२० या काळात वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. पीडित तरूणीने लग्नाचा तकादा लावल्यावर अक्षय रिंढे याने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडित तरूणीच्या तक्रारीवरून अक्षय रिंढे याच्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक मिरा लाड करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!