#CoronaEffect : औरंगाबादकर सावधान : सवलतींचा गैरफायदा घेणारांना प्रशासनाचा कडक ईशारा….

औरंगाबाद शहरामध्ये कोरोना वायरच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरांमध्ये लॉक डाऊन /संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे संचारबंदी मध्ये नागरिकांनी अत्यावश्यक सेवा शिवाय किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी शिवाय घराबाहेर निघू नये असे पोलिस प्रशासनाने /जिल्हा प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे .तरीपण काही नागरिक या सवलतीचा गैरफायदा घेऊन रस्त्यावर विनाकारण फिरत असताना दिसून आले आहेत. त्यांच्यावर कडक स्वरूपाची कार्यवाही ही करणे चालू आहे.
आज ज्यांनी या संचारबंदी च्या दरम्यान त्याचे उल्लंघन केले म्हणून ३२ लोकावर गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत. आणि आतापर्यंत संचार बंदीच्या काळात 144 लोकावर लॉक डाऊन/संचारबंदी चे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे . कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उद्या आणखीन कडक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे . त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे तरी नागरिकाला पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की आपण कोणत्याही परिस्थितीत विनाकारण रस्त्यावर फिरू नये आपापले घरातच सुरक्षित राहावे अन्यथा जे कोणी कायद्यायचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.