Aurangabad : #CoronaEffect : हर्सूल कारागृहातून ४४ कैदी जामिनावर मुक्त

औरंगाबाद – हर्सूल कारागृहातून न्यायालयाच्या अादेशाने नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४४कैद्यांची ४५दिवसांकरता विशेष जामिनावर मुक्तता केली आहे.अशी माहिती तुरुंगनिरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर मुक्त केलेल्या कैद्यांना पोलिसांनी त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडले आहे.अद्याप आणखी कैद्यांचे आदेश येणे बाकी असून आदेश येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.