#CoronaVirusUpdate : जनता कर्फ्यूमुळे शहरात सर्वत्र सन्नाटा , रेल्वे स्टेशन पूर्णतः बंद

देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील जनता आज स्वतःच्या घरात आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या घरातच राहिल्यास संसर्ग होण्याची साखळी रोखता येणं शक्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनचा सल्ला दिला. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरं पूर्णपणे लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर, मुंबई आणि पुण्यात अगोदरच अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद शहरात पूर्णतः शांतता असून गाजवलेल्या रेल्वे स्टेशनवरची हि छायाचित्रे