Aurangabad : हर्सूल कारागृहातील कैदी बनवताहेत ऑर्डरप्रमाणे मास्क

राज्यात सर्वत्र लोक कोरोनामुळे त्रस्त असताना याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदारांनी ग्राहकांची लूट लावली आहे . हि बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने ग्राहकांची लूट थांबावी म्हणून बाजारपेठेत विकण्यात येणारे मास्क आणि सॅनिटाझर्सच्या किमती कायद्याने नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असतानाच औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या मास्कला चांगलीच मागणी येत आहे. आतापर्यंत कारागृहातील कारखाना विभागातून हायकोर्ट औरंगाबाद यांना २३७ नग , ५०० नग मास्क भारतीय स्टेट बॅक , पोलिस आयुक्त औरंगाबाद यांना १२५० नग मास्क चा पुरवठा करण्यात आला आहे.