Aurangabad Crime : गुन्हेशाखेच्या कारवाईत २ लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या, एक फरार

औरंगाबाद- कारमधून ४२किलो गांजा घेऊन जाणार्या दोघांना शुक्रवारी गुन्हेशाखेचे एपीआय गौतम वावळे यांनी पाठलाग करुन पकडलै.त्त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल अशोक भालेराव (२२) रा. मिसारवाडी, सागर छगन खंडागळे (२४) रा. आंबेडकरनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.तर आरोपींचा तिसरा साथीदार दिनेश मोकळे पळून गेला.आरोपींच्या ताब्यातून २लाख १० हजारांचा ४२किलो गांजा जप्त केला.हा गांजा आरोपी अमोल भालेराव चे वडील अशोक भालेराव यांचा असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.
गुन्हैशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना खबर्याने सांगितले की,आंबेडकरनगर ते पिसादेवी रोडवर गांजा घेऊन एक चाॅकलेटी रंगाची ह्युंडाई कार येणार आहे.त्यानुसार एसीपी डाॅ.नागनाथ कोडे यांचे मार्गदर्शन घेऊन पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी एपीआय वावळे यांना कारवाईचे आदेश दिले.एपीआय वावळे यांनी पोलिस कर्मचारी शेखनजीर, सुधाकर मिसाळ, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, आनंद वाहुळ यांना सोबंत घेत कारवाई पार पाडली.पुढील तपास सिडको पोलिस करंत आहेत.