Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रेकाॅर्डवरच्या गून्हेगाराकडून जबरी चोरी, ७ तासात मुद्देमालासह अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मुकुंदवाडी, एम-सिडकोआणि क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगाराने नागरिकाच्या अंगावर रिक्षा घालून मोबाईल हडप केला.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.व आरोपीला ७ तासात जेरबंद करण्यात आले.त्याच्या कडून १लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लहू ऊर्फ झगल्या रमेश चव्हाण(२५) रा.मुकुंदनगर मुकुंदवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे.
विद्यानगरात राहणारे गिरीष गोळेगावकर हे परभणीहून रेल्वेने घरी परतत असतांना सेव्हनहिल हून पायी गुरुवारी रात्री १२.३० वा.घराकडे निघाले होते.रस्त्यात आरोपी लहू रिक्षामधे बसला होता. त्याच्या सोबंत एक अल्पवयीन चोरटाही होता.त्यांनी गोळेगावकरांना रिक्षामधे येण्याचा आग्रह केला.पण गोळेगावकरांनी नकार देताच लहू चव्हाण ने त्यांच्या अगावर मागून रिक्षा घातला.या प्रकाराने घाबरलेल्या गोळेगावकरांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले.त्यावेळी त्यांच्या खिशातील १६हजार रु.चा मोबाईलही पडला लहू चव्हाण ने मोबाईल हिसकावून रिक्षा सहित पोबारा केला.सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांनी गिरीष गोळेगावकरांची फिर्याद घेत गुन्हा दाखल केला.व सात तासाच्या आत लहू चव्हाण ला बेड्या ठोकल्रा. लहू चव्हाणवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ४, एम सिडको मधे १व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात १असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!