सातारा परीसर सुवर्णकार मंडळाच्या वतीने संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी

संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी कल्याणी बालक मंदिर छत्रपती नगर सातारा परीसर येथे साजरी करण्यात आली. प्रथम सुनिल डहाळे व नवनाथ पवार (संत नरहरी चरीत्र अभ्यासक)
यांच्या हस्ते आरती पुजन केले. सुनिल डहाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व नवनाथ पवार यांनी संत नरहरी महाराज यांच्या चरीत्रावर अत्यंत महत्वपुर्ण माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे नियोजन संतोष ऊदावंत सुरेश कूलथे विलास डहाळे सुनिल शहाणे विजय शहाणे सुनिल दहिवाळ राजकुमार ऊदावंत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.मुकूंद कूलथे बालाजिराव शहाणे राजकुमार ऊदावंत सुनिल शहाणे माधवराव शहाणे रत्नेश मुंडिक सहकूटूंब व सातारा परीसरातिल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.