Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : २०० रुपयासाठी सावत्र भावाला पेट्रोल टाकून पेटवले, पश्चाताप झाल्याने शरण आलेल्या आरोपीस अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – शनिवारी बनेवाडी शिवारात मजूरी करुन घरी परतलेल्या सावत्र भावाला २०० रुपये मागूनही न मिळाल्यामुळे पेट्रोल टाकून पेटवून देणारा भाऊ रात्री १२ च्या सुमारास वेदांतनगर पोलिसांना शरण आला. सोमेश कुमावत असे शरण आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

वरील प्रकरणात फिर्यादी वरुण कुमावत (३२) रा, बनेवाडी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, वरुण शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घरी परतला होता.त्यावेळी वरुण यांचा सावत्र भाऊ सोमेश कुमावत यांने २०० रु वरुण कडे मागंत भावाशी वाद घातला.पण वरुण यांनी ड्रिंक घेऊन जेवण केले व सोमेशकडे लक्षच न दिल्यामुळे सोमेश चिडला होता. वरुण जेवण करुन झोपल्यानंतर सोमेशने वरुण यांच्या अंगावर पेट्रोल टाकून रात्री ९वा.पेटवून दिले व घराची कडी बाहेरीन लावून पसार झाला. वरुण नशेत असल्यामुळे पेटल्यानंतर थोड्या उशीराने जाग आली अंगाला चटके बसू लागल्यामुळे वरुण घाबरुन ओरडू लागला तेंव्हा त्याच्या लक्षात आले की घरही पेटलेले आहे. त्याचा ओरडा ऐकून परिसरातील लोक मदतीला धावून आले. व आग विझवंत वेदांतनगर पोलिसांना फोनवरुन घटनैची माहिती दिली.  दरम्यान सोमेश विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल होताच मध्यरात्री १२ च्या सुमारास सोमेश पोलिसांना शरण आला. पोलिसांनी सोमेश ला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!