Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तीन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या बायकोच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून तिघांना बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – कॅटरिंग व्यवसायानिमित्त अहमदाबाद (गुजराथ) ला नेलेल्या विधवेला तीघांनी दीड लाखात विकून शहरात परतल्यानंतर थोड्याच दिवसात खरेदी केलेल्या पत्नीच्या अल्पवयीन मुलीचे शोषण करणार्‍या विरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत. दरम्यान महिलेची विक्री करणार्‍या तिघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.तर शोषण करणार्‍या आरोपीच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

Advertisements

२०१७साली शहरातील योगेश बोरसे,त्याची पत्नी जुनैबी रा. संजयनगर व तिसरी फरजाना रा.नारैगाव यातील फरजाना ही रेकाॅर्डवरची गुन्हेगार असून तिच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मानवी विक्रीचा गुन्हा दाखल आहे. वरील तिन्ही आरोपींनी शहरातील शबाना(नाव बदलले आहे.) ला तीन वर्षांपूर्वी कॅटरिंगच्या कामानिमित्त गुजराथ ला नेऊन तेथील नरेश पटेल या व्यक्तीला दीड लाख रु.त विकले. नरेश पटेलनेही खरेदी केलेल्या या शबानाशी लग्न केले. शबानाला पहिल्या नवर्‍यापासून  सहा मुली आहेत. तर नरेश पटेल पासुन एक मुलगा आहे. सहा पैकी एका मुलीला नरेश पटेल च्या म्हणजे घरी शबानाने एक वर्षापूर्वी नेले. नरेश पटेल ने सावत्र मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले . हा प्रकार पिडीतेने आपल्या आईला  सांगितल्यावर शबानाने सरळ ३०जानेवारी रौजी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके आणि पुनम पाटील करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!