हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही , लातूर येथील जंगम स्वामी वधू-वर सूचक मेळाव्यात उपवर वधूवरांनी घेतली प्रतिज्ञा

संगमेश्वर स्वामी
लातूर जिल्हा जंगम समाज प्रणित जंगम वेलफेयर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबाई मंगल कार्यालय येथे रविवारी हा वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी मंचावर जिल्हाधिकारी जी श्रीकांत, नाशिक महसूल विभागाचे उपायुक्त दिलीप स्वामी, दीव दमण येथील पोलीस अधीक्षक हरेश्वर स्वामी, न्यायाधीश संदीप स्वामी, महिला व बालकल्याण अधिकारी वर्षाताई पवार शिंदे, महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, विश्वनाथ निगुडगे, सुभाष देवणीकर, शरणाप्पा कलेमले, षण्मुखानंद मठपती, सूर्यकांत पत्रे वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष जगदीश स्वामी, डॉक्टर संजय स्वामी, सविता स्वामी, सुहास स्वामी, मनोज स्वामी, नागेश स्वामी यांची उपस्थिती होती.
बदलत्या काळानुसार युवकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे जीवनात चारित्र्य महत्त्वाच्या आहे आणि चारित्र्यसंपन्न युवकच समाज घडवतो असे प्रतिपादन राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी या मेळाव्यात बोलताना केले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी उपवर वधूवरांना हुंडाविरोधी शपथ दिली. हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नसल्याचे सांगून मुलींनी स्वावलंबी बनावं असंही ते म्हणाले. या वधू-वर परिचय मेळाव्यात चार आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. उपायुक्त दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक हरेश्वर स्वामी, न्यायाधीश संदीप स्वामी यांनी यावेळी समाजाला यथोचित मार्गदर्शन केलं.
समाजात हुंड्याला बदनाम केल्याशिवाय ही दृष्ट प्रथा बंद होणार नाही, त्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केली. या वधू-वर परिचय मेळाव्याला राज्यातील पंधराशे उपवर वधूवरांनी सहभाग नोंदवला. यावेळी राज्यभरातून अडिच हजार समाज बांधव उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवकांत स्वामी डॉक्टर सचिन बालकुंदे, प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती, स्नेहा शिंदे यांनी केले तर सुहास स्वामी यांनी आभार मानले.
या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शरणप्पा दावणगिरी, श्रीकांत हिरेमठ, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, संगमेश्वर स्वामी, सविता स्वामी, नितीन कलेमले, डॉक्टर संजय वाडकर, डॉक्टर अशोक काळगे, अनिल स्वामी, सचोटी स्वामी, सुहास स्वामी, सुभाष देवणीकर, सुनंदाताई स्वामी, डॉक्टर गणेश स्वामी, सुनील स्वामी, शिवय्या स्वामी, शोभा सावळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.