पोलिस आयुक्तालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर का उताराला ? अधिकार्यांचे मात्र कानावर हात….

औरंगाबाद – पोलिस आयुक्तालयातील राष्ट्रध्वज सोमवारी अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. या विषयी पोलीस कर्मचाऱ्यांना तर सोडाच पण अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नव्हती , हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या कानावर टाकला तेंव्हा त्यांनीही आपल्या या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दिव्या ज्ञानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
ओमान चे सुलतान यांचे १० जानेवारी २०२० रोजी निधन झाल्याने त्यांना आदरांजली म्हणून सोमवारी देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात यावा असे आदेश केंदीय गृहमंत्रालयाने जारी केले होते त्यानुसार १२ जानेवारी प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार आज दुखावटा पाळण्यात आला. मात्र पोलीस आयुक्तालयात काय घडते आहे याची साधी माहितीही येथील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्हती, या बद्दल वरिष्ठ सुत्रांनीही खेद व्यक्त केला.
या प्रकाराबद्दल काही अधिकरी आणि कर्मचाऱ्यांनी इतकी गमतीशीर उत्तरे दिली कि , सांगणेही कठीण आहे . काही जणांनी तर कोणी तरी गेले असेल , काय माहित नाही हा सर्व घटनाक्रम पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या कानावर प्रत्यक्ष भेटून घातल्यावर त्यांनीही खेड व्यक्त केला.