औरंगाबाद : थर्टी फस्ट ची पार्टी बेतली जीवावर , बीएमडब्ल्यू कार विहिरीत पडून दोन ठार तर ३ जखमी

औरंगाबाद शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दौलताबाद घाटात भीषण अपघात झाला असून बीएमडब्ल्यू कार विहिरीत पडून दोन ठार तर ३ जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री २ वाजताची घटना घडली. थर्टीफस्टची पार्टी करुन घरी जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पोलीस निरीक्षक राजर्षी आडे अधिक तपास करीत आहेत
मिळालेली माहिती अशी की, नवीन वर्षाचे स्वागत करुन घरी परतताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात कार विहिरीत कोसळली. यामध्ये दोन ठार तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सौरभ नांदापूरकर (वय-२९, रा.रा रोकडे हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (वय-३४, रा.पुंडलिक नगर) असे दोन्ही मृत मुलांची नावे आहेत. तर नितीन शिशीकर (वय- ३४), प्रतिक कापडीया (वय-३०), मधूर जयस्वाल (वय- ३०) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. विहिरीत पडलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली आहे.