Bad News : “ते ” गावाजवळ पोहोचणारच होते तेवढ्यात भरधाव वेगातील ट्रक ने संपविले त्यांचे आयुष्य !! , बैलांसह ४ ठार , एक जखमी

सोलापूर -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडीवर भरधाव वेगात आलेला कर्नाटकातील ट्रक आदळून झालेल्या भीषण अपघातात बैलांसह ४ जण जागीच ठार झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा – येडशी रोडवर हा अपघात झाला आहे. संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली. कळंब तालुक्यातील वडगाव जहांगीर येथे घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बैलगाडीचा चक्काचूर झाला. यात ४ जण जागीच ठार झाले आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. तसंच या अपघातात दोन्ही बैलांचा जागीच मृ्त्यू झाला. सर्व जण वडगावचे रहिवासी होते.
मयतामध्ये युवराज शेटे (वय ७) मुलगी गुंजन माळवदे (वय १३) सौ फनुबाई पवार (वय ५०) आणि रेश्मा माळवदे (वय ४० ) यांचा मृत्यू झाला आहे. तर दत्तात्र्ये शेटे (वय ३५) हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी उस्मानाबादयेथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वेळा अमावस्येचा सण आनंदात साजरा करून सायंकाळच्या सुमारास शेतातून हे शेतकरी कुटुंबातील लोक आपल्या घराकडे परतत असतानाच भरधाव वेगतील ट्रक त्यांच्यावर चाल करून आला आणि हा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एका बैलासह दोन महिलांसह एका लहान मुलीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका मुलाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी सांगितले कि , कळंब व उस्मानाबाद तालुक्याच्या सीमेवरील वडगाव जहांगीर येथील शेतकरी दत्तात्रय शेटे (वय ३५ ) हे वेळा अमावस्येचा सण साजरा करून रात्री ७.३० वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी परतत होते. यावेळी बैलगाडीत त्यांच्यासह त्यांचा सात वर्षीय मुलगा युवराज शेटे, रेश्मा माळवदे (वय ४०), फनुबाई पवार (वय ४०) आणि रेश्मा माळवदे (वय ४०) हे होते. दरम्यान बैलगाडी गावाजवळ पोहोचणारच होती तेवढ्यात औरंगाबादहून उस्मानाबादकडे भरधाव वेगात येणार्या कर्नाटकातील मालट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे लोखंड व लाकडाच्या असलेल्या बैलगाडीचा अगदी चुराडा झाला. याशिवाय, अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवराज शेटे याचा देखील उपचारादरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. तर दत्तात्रय शेटे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून ट्रकचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जाणाऱ्या ट्रकला येडशी येथील टोलनाक्याच्या पुढे अडवून ट्रकचालकास पकडण्यात आले आहे.