Aurangabad crime : तलवार घेवून फिरणारा वळदगावचा ग्रामपंचायत सदस्य पुंडलिकनगर पोलिसांच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : महिनाभरापुर्वी हातात तलवार घेवून फिरत असलेला व्हीडीओ व्हायरल झालेला वळदगावच्या ग्रामपंचायत सदस्याला गावातील लोकांनीच टिप देऊन पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी रिलायन्स माॅलसमोरील राधाकृष्ण मंगल कार्यालयातून मंगळवारी (दि.२४) दुपारी दिड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या.
नारायण रामचंद्र डांगर उर्फ राजपूत (रा.वळदगाव, ता.गंगापुर) असे तलवार घेवून फिरणा-याचे नाव आहे.हा ग्रामपंचायत सदस्य आहे. तो गेल्या एक महिन्यापासुन फरार होता.तो राजस्थानात असल्याची माहिती गावकर्यांना मिळाली होती.त्याला आगामी निवडणूकीचे कारण सांगून औरंगाबादेत बोलावले होते. त्यानंतर तो शहरात एका नातेवाईकाच्या कारमधे तलवार घेऊन फिरत होता. मंगळवारी तो गारखेडा परिसरातील राधाकृष्ण मंगलकार्यालयात आल्याची टिप पुंडलिकनगर पोलिसांना मिळताच त्याला मंगलकार्यालयात जाऊन पोलिसांनी फटके देऊन ताब्यात घेतले.
महिनाभरापुर्वी हातात तलवार घेवून नारायण राजपूत फिरत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. वरील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, जमादार रमेश् सांगळे, मच्छींद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, दिपक जाधव, नितेश जाधव, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, राजेश यदमळ, रवी आदव आदींच्या पथकाने केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १ हजार रूपये विंâमतीची तलवार जप्त केली आहे.