मावसाळा बुद्धभूमीवर आज महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या अस्थीकलशाचे दर्शन

मावसाळा येथे आज सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अस्थीदर्शनासाठी जगप्रसिद्ध वेरूळ येथील बुद्ध लेणी पासून अगदी जवळ असलेल्या मावसाळा “बुद्धभूमी ” येथील विश्वशांती बुद्ध विहार , येथे सर्व उपासक – उपासीका यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात भदंत एस .प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांनी कळविले आहे कि , ” अखिल भारतीय भिक्षूसंघाचे प्रचार मंत्री प्रा .भदंत सुमेधबोधी, महास्थविर यांनी भदंत एस . प्रज्ञाबोधी महाथेरो यांच्या कार्याची दखल घेऊन मावसाळा येथील केंद्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ” अस्थीकलश ” २०१४ साली कायम स्वरूपी दान दिला आहे. तेव्हापासून दरवर्षी दि.६ डिसेंबर रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयान दिनी दि.६ डिसेंबर २०१९ शुक्रवार रोजी सकाळी १० पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपासक – उपसीकाना अभिवादन करण्यासाठी “अस्थिकलश ” ठेवण्यात येणार आहे .
या प्रसंगी भदंत प्राचार्य खेमधम्मो ( महस्थविर ),भदंत एस .प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) प्रा. भदंत एम. सत्यपाल ( पाली विभाग मिलिंद कॉलेज ) ,भदंत धम्मतिस्स ( अमरावती ) , भदंत डॉ. आनंद ( नागपूर )भदंत आयुपाल ( मुंबई ),भदंत प्रज्ञाकीर्ती ( जालना ), भदंत सागरबोधी ( व्यवस्थापक बुद्धभूमी मावसाळा ) ,भदंत राजरत्न ( काजळा ), भदंत रष्ट्पाल , भन्ते राहुल ( यवतमाळ ) ,भन्ते अत्तदीप ,भन्ते आनंद , भन्ते रेवत ,भन्ते धम्मरत्न आदी भिक्षूं संघ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपा .माधव बोरडे( शिक्षण महर्षी ) , मा .सुधाकर बनाटे ( मा.उपसंचालक शिक्षण विभाग ) मा. दिनेशभाऊ अंभोरे ( माजी सभापती पंचायत समिती खुलताबाद ), मा.बाबासाहेब सदावर्ते औरंगाबाद तसेच खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती उपसीका अर्चनाताई अंभोरे आदी मान्यवर उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
उपासक उपसिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यासाठी तसेच भिक्षूंसंघाच्या धम्मदेसनेचा आणि मान्यवरांच्या भाषणाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय बौद्धधम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ , डॉ . बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड फायटिंग फोर्स ,महाराष्ट्र आणि खुलताबाद तालुक्यातील उपासक – उपासीका यांनी केले आहे अधिक माहिती साठी संस्थापक अध्यक्ष – भदंत एस .प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) यांच्या 8007174657 या भ्रमण ध्वनी वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.