Aurangabad Crime : भाडेकरूंनी मागीतली घरमालकास ४ लाखाची खंडणी

औरंंंगाबाद : भाडेकरू म्हणून राहणा-या चार जणांनी घरमालकास ४ लाख रूपयांची खंडणी द्या नसता, जीवे मारून टाकू अश ी धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार जिन्सी परिसरातील रविंद्रनगर भागात घडला असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल हाफीज खान माजीद खान, शारेक खान अब्दुल हाफीज खान, व त्यांच्या दोन महिला साथीदार चौघे रा. रविंद्रनगर अशी खंडणी मागणा-या भाडेकरूंची नावे आहेत. रविंद्रनगर परिसरातील रहिवासी पेâरोज अहेमद खान एकबाल अहेमद खान (वय ३२) यांच्याकडे अब्दुल हाफीज खान हा आपल्या कुटुंबियासह भाडेकरू म्हणून १५ ऑगस्ट २०१८ ते ३० मे २०१९ या काळात राहत होते. भाडेकरारनामा संपल्यावर पेâरोज अहेमद खान हे अब्दुल हाफीज खान यांना घर खाली करण्यास सांगितले. त्यावेळी अब्दुल हाफीज खान यांनी घर खाली करण्यास नकार देत पेâरोज अहेमद खान यांना ४ लाख रूपये खंडणी द्या, नसता तुम्हाला जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली होती.
याप्रकरणी पेâरोज अहेमद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्दुल हाफीज खान याच्यासह चार जणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते करीत आहेत.